23.7 C
New York
Friday, September 18, 2026
spot_img
spot_img

बुलढाणा येथील ओमीक भाकडे ची क्रीडाक्षेत्रात उत्तुंग भरारी

अवघ्या एका वर्षाच्या सरावात ओमिक भाकडेची सुवर्ण झेप!

21 वर्षांखालील ज्युनिअर कंपाऊंड राज्यस्तर चॅम्पियनशिप मध्ये मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदक

बुलढाणा (प्रतिनिधी),
दि. 15 सप्टेंबर : नंदुरबार येथे दि. ५ ते ७ सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या २३ व्या ज्युनियर राज्यस्तरीय आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये १२ वर्षीय कु. ओमिक दत्तात्रेय भाकडे याने कंपाऊंड प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले.

विशेष म्हणजे, ओमिकने तिरंदाजीचे प्रशिक्षण सुरू करून अवघे एक वर्ष पूर्ण झाले असतानाच हे उल्लेखनीय यश संपादन केले. त्याने आपल्या अचूक लक्ष्यभेदाच्या जोरावर त्याच्यापेक्षा ७ ते ८ वर्षांनी मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

ओमिकच्या या दैदिप्यमान कामगिरीचे क्रीडा क्षेत्रातून विशेष कौतुक होत असून, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. चंद्रकांत इलग सर यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अवघ्या १२व्या वर्षी मिळवलेल्या या यशाबद्दल ओमिक दत्तात्रेय भाकडेचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील उज्ज्वल क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
चौकट
महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल (WHC) सोनाली वडतकर (भाकडे) पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण
पोलीस कॉन्स्टेबल (Pc) दत्तात्रय भाकडे पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण यांचा ओमीक हा 12वर्षाचा मुलगा आहे हे विषेश

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!