11.9 C
New York
Tuesday, October 28, 2025
spot_img
spot_img

भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी कैलास राऊत

*सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती युवा मोर्चा भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास राऊत यांची नियुक्ती*
गेल्या अनेक वर्षापासून देऊळगाव मही मध्ये भाजपा शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिले तसेच सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वेळा उपोषणे भीक मागो आंदोलन दवाखान्यातून एखाद्या बिमार व्यक्तीचा अर्ध्या रात्रीला फोन आला असता त्या ठिकाणी जाऊन मदत करणे देऊळगाव मही मध्ये बसस्थानक नसल्यामुळे परिसरातील जनतेला उन्हाळा हिवाळा पावसाळा या ऋतूमध्ये कुठे बसण्यासाठी सुद्धा जागा नाही बस स्थानक व्हावे यासाठी कित्येक वेळा आंदोलने आणि उपोषणे कैलास राऊत यांनी केली आहे असे अनेक कामे देऊळगाव मही शहराध्यक्षपदी असताना कैलास राऊत यांनी केली आहे तसेच भारतीय जनता पार्टीचे 1000 सदस्य नोंदणी त्यांनी घरोघरी जाऊन केली आहे याची दखल भारतीय जनता पार्टीने घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला युवा मोर्चा भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास राऊत यांची नियुक्ती केली त्याबद्दल सर्वत्र कैलास राऊत यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
*कैलास राऊत यांनी दिनदुबळ्या गरीब कष्टकरी शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी तसेच भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण घराघरात पर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी तत्पर्य राहील* असे युवा मोर्चा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास राऊत यांनी सांगितले ….

ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!