6.4 C
New York
Wednesday, January 14, 2026
spot_img
spot_img

भाजपाच्या किसान जिल्हा मोर्चा सचिवपदी लोकेश डोणगावकर

भाजपाच्या किसान जिल्हा  मोर्चा सचिवपदी लोकेशची डोणगावकर ची निवड
देऊळगाव राजा :
  • भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा स्तरावरील महत्त्वाच्या बैठकीत आज जिल्हा सचिवपदी नवीन जबाबदारी जाहीर करण्यात आली. पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही निवड एकमताने पार पडली.
नवीन जिल्हा सचिवपदी कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी नवीन जिल्हा सचिवांनी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. लोकेश डोणगावकर हे बरेच दिवसापासून भाजपाच्या अनेक कामात हिरीरीने भाग घेऊन न्याय देण्याचे काम करत आहे.
बैठकीस जिल्हाध्यक्ष विजयराजे शिंदे किसान जिल्हा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चक्रधर लांडे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांन्टे संघर्ष समितीचे  डॉ.सुनील कायंदे महिला जिल्हाध्यक्ष सौ सविता पाटील, धर्मराज हनुमंते डॉक्टर शंकर तलबे निशिकांत भावसार संजय तिडके तसेच भाजपा शहर व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच युवा नेतृत्व लोकेश डोणगावकर यांना जिल्हा किसान मोर्चाच्या सचिवपदी निवड झाल्याने शहरात सर्वत्र कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
ads

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!