वार्ड क्रमांक ६ मधून शहराध्यक्ष रेखाताई पवार नगरसेवक पदाच्या तयारीत
देऊळगाव राजा….
राष्ट्रवादीच्या माध्यमातून समाजकार्य व महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन दशके झटणाऱ्या नेतृत्वाची नव्या लढाईसाठी सज्जता
देऊळगाव राजा : शहरातील वार्ड क्रमांक सहा मधून शहराध्यक्ष रेखाताई पवार यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारीची तयारी सुरू केली आहे. तब्बल वीस वर्षांपासून माजी मंत्री डॉ. शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय कार्याची सुरुवात करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे.
रेखाताई पवार या नावाने देऊळगाव राजा शहरात महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला गेला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंमदत गट उभारणी, आरोग्य जनजागृती शिबिरे, रोजगार प्रशिक्षण उपक्रम, आणि बालिकांच्या शिक्षणासाठी मोहिमा अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. महागाई, शेतकरी प्रश्न, महिला अत्याचार यासारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने भूमिका मांडत जनतेच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला.
त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला असून, त्या समाजाभिमुख, संपर्कक्षम आणि कार्यतत्पर नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात.
रेखाताई पवार यांनी सदैव “सेवा हीच माझी ओळख” या ब्रीदवाक्याला धरून कार्य केलं असून, शहर विकासासाठी ठोस नियोजन व महिलांसाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे. नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. रेखाताई पवार यांच्यासाठी महिलांचा पाठिंबा जोरदार आहे
वार्ड क्रमांक सहा मधील मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली असून, त्यांच्या वार्डा मधे रंगतदार आणि चुरशीची लढत होण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.






Total Users : 232223