देऊळगाव राजा : नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुणजी मोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक मातृतीर्थ एक्स्प्रेस परिवाराच्या वतीने त्यांना कडाडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
देऊळगाव राजाच्या विकासाला नवी दिशा देणारे, शहराचा चेहरामोहरा बदलण्याची दूरदृष्टी बाळगणारे, प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण करणारे आणि प्रत्येक निर्णयात लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे अधिकारी म्हणून अरुण मोकळे साहेबांची ओळख निर्माण झाली आहे. अभ्यासू, धाडसी, संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासक म्हणून त्यांनी अल्पावधीतच नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
पत्रकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध संघटनांशी समन्वय साधत सर्वांना सोबत घेऊन विकासाची वाटचाल करण्याची त्यांची कार्यशैली विशेष उल्लेखनीय आहे. कोणत्याही समस्येच्या दोन्ही बाजू समजून घेत संयम, समयसूचकता आणि न्याय्य भूमिका घेण्याची त्यांची हातोटी प्रशासनातील आदर्श कार्यपद्धती मानली जाते.
त्यांच्या नेतृत्वाखाली देऊळगाव राजामध्ये विकासकामांना गती मिळाली असून, शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय नागरिकांसाठी आशादायी ठरत आहेत. विकासाभिमुख व लोककेंद्री प्रशासनाचा ठसा त्यांनी शहरावर उमटविला आहे.
साप्ताहिक मातृतीर्थ एक्स्प्रेस परिवाराच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली की, मुख्याधिकारी अरुण मोकळे साहेबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड ऊर्जा आणि उत्तरोत्तर यश लाभो. त्यांच्या हातून समाजहिताची, जनकल्याणाची आणि विकासाची अशीच अनेक लोकोपयोगी कार्ये घडत राहोत, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करण्यात आली.






Total Users : 232223